Mumbai | Girish Mahajan | मुंबईत भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री गिरीश महाजनांना थेट जाब, व्हिडिओ झाला व्हायरल
मुंबईत भाजपच्या जनआक्रोश मोर्चादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीष महाजन यांना जाब विचारत संताप व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, मोर्चामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे त्रस्त झालेल्या महिलेने “बाजूलाच मैदान असताना रस्त्यावर मोर्चा का काढला?” असा सवाल करत गिरीष महाजन आणि पोलिसांशी वाद घातला.
मुंबईत भाजपच्या जनआक्रोश मोर्चादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीष महाजन यांना जाब विचारत संताप व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, मोर्चामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे त्रस्त झालेल्या महिलेने “बाजूलाच मैदान असताना रस्त्यावर मोर्चा का काढला?” असा सवाल करत गिरीष महाजन आणि पोलिसांशी वाद घातला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, त्यावरून राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दरम्यान, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या घटनेवर टीका करत, “महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मंत्र्याला अशा प्रकारे नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं,” असं वक्तव्य केलं. या घटनेमुळे मोर्चे आणि सार्वजनिक वाहतुकीवर होणारा परिणाम हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Published on: Apr 22, 2026 12:43 PM
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...

