राज ठाकरे यांचं वाढदिवसानिमित्त मनसैनिकांना खास आवाहन, म्हणाले, ‘भेटवस्तू आणू नका तर…’

राज ठाकरे यांचं वाढदिवसानिमित्त मनसैनिकांना खास आवाहन, म्हणाले, ‘भेटवस्तू आणू नका तर…’

Harshada Shinkar | Updated on: Jun 12, 2023 | 1:04 PM

VIDEO | राज ठाकरे यांचं सोशल मीडियावर पोस्ट करत मनसैनिकांना नेमकं काय केलं आवाहन?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा येत्या १४ जून रोजी वाढदिवस आहे. या दिवशी राज ठाकरे यांनी भेट देण्यास आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता राज्यातील अनेक कार्यकर्ते, मनसैनिक आणि त्यांचे चाहते येत असतात. यावेळी प्रत्येक जण राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी दाखल होत त्यांना काही न् काही भेट वस्तू देत असतो. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांसह चाहत्या वर्गाकरता सोशल मिडियावर एक पोस्ट लिहिली आहे. राज ठाकरे यांनी असे लिहिले की, ‘दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे. ‘

Published on: Jun 12, 2023 01:00 PM
Follow Us