महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी दुधाच्या दरात वाढ
देशभरात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडत असतानाच आता दूध दरवाढीचा आणखी एक मोठा झटका ग्राहकांना बसला आहे. अमूल आणि मदर डेअरीनंतर आता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’नेही गायीच्या दूध विक्री दरामध्ये प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशभरात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडत असतानाच आता दूध दरवाढीचा आणखी एक मोठा झटका ग्राहकांना बसला आहे. अमूल आणि मदर डेअरीनंतर आता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’नेही गायीच्या दूध विक्री दरामध्ये प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ 21 मे 2026 पासून लागू होणार असून, कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि कोकण विभागातील ग्राहकांना त्याचा थेट फटका बसणार आहे.
शनिवारी गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात प्रशासक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दूध दरवाढीच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यात आली. गोकुळकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही वाढ प्रामुख्याने गायीच्या दूध प्रकारांसाठी लागू असेल.
दरवाढ लागू होणाऱ्या उत्पादनांमध्ये गायीचे दूध (Cow Milk), टोण्ड दूध (Toned Milk), गोकुळ शक्ती (Gokul Shakti) आणि स्टँडर्ड दूध (Standard Milk) यांचा समावेश आहे. मात्र, ग्राहकांसाठी काहीसा दिलासा म्हणजे म्हशीच्या दूधाच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे म्हशीच्या दूधाचे विद्यमान दर कायम राहणार आहेत.
दरम्यान, वाढते उत्पादन खर्च, पशुखाद्याचे वाढलेले दर आणि वाहतूक खर्च यामुळे दूध दरवाढ अपरिहार्य असल्याचे दूध संघाकडून सांगितले जात आहे. मात्र, सतत वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर आणखी ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: May 17, 2026 09:37 AM
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप

