Gopichand Padalkar | शंभूराज देसाई यांची माहिती खोटी, पोलीस माझे नाहीत तुमचे; पडळकरांनी स्टेशन डायरी वाचली
गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटलं की फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा माझ्यावर गुन्हे होते हे सर्व खोटं आहे. मला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी मी लढा सुरूच ठेवणार, असल्याचं पडळखर म्हणाले.
गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी सभागृहात दिलेली माहिती खोटी आहे. पोलीस स्टेशन मधील डायरीत मी हल्ला केला असा कुठेही उल्लेख नाही. उलट 200 लोकांचा जमाव जमला होता माझ्या गाडीवर हल्ला झाला असा उल्लेख आहे. गृहराज्यमंत्री यांनी सभागृहाची दिशाभूल केली आहे. मी कुठेही खाली उतरलो नाही मी गाडी अंगावर घालास, असं म्हटलं नाही. याच लोकांनी खोटे साक्षीदार उभे केलेत. माझ्या वरील गुन्ह्याचा पाढा वाचला हो मी गुन्हेगार आहे पण सर्व गुन्हे सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेत, असं भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. जनतेसाठी लढा देतोय म्हणून तीन पक्षातील प्रस्तापित मला कुठे तरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. जमिनी बळकावल्याचा गुन्हा माझ्यावर कोणता नाही सर्व गुन्हे आताचेच आहेत. गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटलं की फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा माझ्यावर गुन्हे होते हे सर्व खोटं आहे. मला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी मी लढा सुरूच ठेवणार, असल्याचं पडळखर म्हणाले.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा

