मनोज जरांगे पाटील 29 तारखेला मुंबईत धडकणार, आंदोलनापूर्वी सरकारकडून मोठं पाऊल, काय घेतला निर्णय?
येत्या २९ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडकणार आहे. दरम्यान, या आंदोलनापूर्वीच सरकारकडून पाऊलं उचलण्यात आलीये.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या आधीच सरकारकडून आता मराठा उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलंय. मराठा उपसमितीचे अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागली आहे. याआधी चंद्रकांत पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष होते. मराठा आरक्षण उपसमिती एकूण बारा सदस्यांची असणार आहे आणि ही उपसमिती मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती संदर्भातला आढावा घेणार आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणविषयक शासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय साधणे, आरक्षणासंदर्भात न्यायाप्रविष्ट प्रकरणांमधील शासनाची बाजू मांडण्यासाठी नेमलेल्या विशेष समुपदेशना सूचना देणे, न्यायालयाने पारित केलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती ठरवणे, न्यायाधीश संदीप शिंदे समितीशी समन्वय ठेवून कामकाजातील अडचणींचे निवारण करणे, मराठा आंदोलक आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणे, जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणीबाबत निर्णय घेऊन प्रक्रिया सुरळीत करणे, मराठा समाजासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि नियंत्रण ठेवणे, अशी कार्यकक्षा या मंत्रिमंडळ उपसमितीची असणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

