राज्यपालांनी केलेलं वक्तव्य तर्कहीन- छगन भुजबळ

अहमदाबादमध्ये ज्या वेळेला 60-70 कापड गिरण्या होत्या वेळेला मुंबईतही 64 गिरण्या होत्या. मुंबईचं हवामान हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिन्ही बाजूंनी समुद्र असल्यामुळे थंड आणि गरम असं तीव्र वातावरण नसतं.

राज्यपालांनी केलेलं वक्तव्य तर्कहीन- छगन भुजबळ
| Updated on: Jul 30, 2022 | 11:41 AM

नाशिकः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुंबई आणि मराठी माणसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सर्वच राजकीय पक्षांकडून टीका होत आहे. नाशिकमध्ये बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ‘ गुजरात आणि राजस्थानमध्ये मुळात व्यापारी समाज आहे. राजस्थानमध्येही काही भागात वाळवंटच आहे. ते लोक बाहेर पडलेले आहेत. बिर्लांचा इतिहास पाहिला, तर ते राजस्थानमधून कलकत्याला गेले. मुंबईतही ही सगळी मंडळी आली आणि हे महत्त्व वाढलं. पण मुंबईच्या मराठी माणसांचे (Mumbai Marathi People) कष्ट विसरता येत नाही. मुंबईत नाशिकमधून पाणी, पुण्यातून भाजीपाला, वीज राज्यभरातून जाते. त्यामुळे ती नसेल तर काय होईल, असा प्रश्न विचारता येईल. अहमदाबादमध्ये ज्या वेळेला 60-70 कापड गिरण्या होत्या वेळेला मुंबईतही 64 गिरण्या होत्या. मुंबईचं हवामान हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिन्ही बाजूंनी समुद्र असल्यामुळे थंड आणि गरम असं तीव्र वातावरण नसतं. दिल्लीसारखं हवेचं प्रदुषण नसतं. एका बाजूनी हवा आली की दुसऱ्या बाजूने निघून जाते. मुंबईची बंदरं, विमानतळं, बॉलिवूडचं (Bollywood) महत्त्वही खूप आहे. यात फक्त गुजरात आणि राजस्थानचे लोक नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी केलेलं वक्तव्य तर्कहीन असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली.

 

 

 

Follow us
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.