भिवंडीतील मतमोजणी केंद्रावर धक्काबुक्की, नेमका काय घडला प्रकार?
भिवंडीमधील मतमोजणी केंद्रावर मोठा राडा. भिवंडीतील मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी काही लोक, समर्थकांनी गेटवर गर्दी केली आणि एकच धक्काबुक्की करत मतमोजणी केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
ठाणे, ६ नोव्हेंबर २०२३ | राज्यभरात काल ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान पार पडलं. काल दिवसभरात २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. तर आज राज्यातील ग्रामपंचायतींसाठी रविवारी झालेल्या मतदानाचे निकाल समोर येत आहे. आज समोर येणाऱ्या निकालावरून कोणत्या गावाचा कोण कारभारी होणार? याचा फैसला होणार आहे. दरम्यान, भिवंडीमधील मतमोजणी केंद्रावर मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भिवंडीतील मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी काही लोक, समर्थकांनी गेटवर गर्दी केली आणि एकच धक्काबुक्की करत मतमोजणी केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरादरम्यान, पोलीस ही धक्काबुक्की होऊ नये किंवा कोणचा गैर प्रकार घडू नये म्हणून काळजी घेत आहे. तर पोलिसांकडून मतदान केंद्रावरील संपूर्ण परिस्थिती हातळण्याचा प्रयत्न होत आहे.

सर्वात वाईट भावनिक स्थिती कोणती आहे?

स्वतःला आर्थिक शिस्त कशी लावावी?

गेलेला विश्वास परत मिळवण्यासाठी काय कराल?

काय सांगताय? जगातील 'हे' प्राणी आपले डोळे बंद केले तरीही पाहू शकतात

तुमच्याही नखांवर आहे का असा 'अर्धा चंद्र', जाणून घ्या काय आहे त्याचं कारण?

तुम्हाला माहितीये का? जगातील 'या' एकमेव देशात मुलंच जन्माला येतच नाही
Latest Videos