फडणवीस – अजितदादांबद्दल सदाभाऊ खोतांचं मोठं वक्तव्य, ‘त्यांची अन् आमची पंगत जरा वेगळी…’
tv9 Marathi Special Report : देवेंद्र फडणवीस यांना भाजपमधील काही प्रस्थापित लोकांच पाठिंबा देत असल्याचे म्हणत महायुतीतील घटक पक्षातील नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांबद्दल मोठी वक्तव्य केली आहेत. बघा सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?
महायुतीतील घटक पक्षातील नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबद्दल मोठी विधानं केली आहेत. मराठा आरक्षणासह विविध विषयावर बोलताना सदाभाऊ खोत यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपचे काही प्रस्थापित लोकंच देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेशी सहमत नाहीत. तर अजित पवार हे सुद्धा एक प्रस्थापित नेते असून त्यांची आणि आमची पंगत वेगळी असल्याचे विधान सदाभाऊ खोत यांनी केले आहे. ‘अजित पवार हे महायुतीत आले पण आम्ही विस्थापितांचे नेते असल्यामुळे आमची पंगत जरा वेगळी आहे. आम्ही विस्थापितांच्या बाजूने आहोत, अजित पवार जरा प्रस्थापितांच्या बाजूने आहेत. भाजपमधील काही प्रस्थापित नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला पाठिंबा देत नाहीत. भाजपमधील अनेक प्रस्थापित नेते हे भित्रे आणि गुळमुळीत बोलणारे आहेत. फडणवीसांच्या भूमिकेवर भाजपातून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि मीच बोलत असतो’, असे सदाभाऊ खोत यांनी स्पष्टच म्हटलं.
Published on: Aug 26, 2024 10:51 AM
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
