पकंजा मुंडे यांच्याशी संबंधित कारखान्यावर छापा, कुठे आणि का झाली कारवाई?
VIDEO | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी संबंधित कारखान्यावर कुणी टाकली धाड, काय आहे कारण? बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी संबंधित कारखान्यावर जीएसटी विभागाने छापा टाकल्याचे समोर आले आहे. १२ कोटी रूपयांचा जीएसटी थकवल्याप्रकरणी जीएसटी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. वैद्यनाथ कारखान्यावर झालेली ही कारवाई आपल्या आधी माध्यमांना समजल्याने पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे खंत व्यक्त केली आहे. या कारखान्याच्या जीएसटीबद्दलचा आमचा अंतर्गत वाद सुरु आहे. तो माध्यमांपर्यंत जाण्याचं काही कारण नव्हतं. मात्र आज अचानक जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. मीदेखील अधिकाऱ्यांशी बोलले. पण अर्जंट कारवाई करण्याचे वरून आदेश होते, असं मला कळालं. तसेच त्यांच्याच वरील कार्यालयाकडून ही बातमी माध्यमांपर्यंत आधी पोहोचल्याचंही मला कळलं, हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. हा कारखाना आर्थिक अडचणीत असल्याचे पंकजा मुंडे यांनी मान्य केले आहे. तर यापूर्वी या कारखान्याचं बँक अकाऊंटही गोठवण्यात आलं होतं. तर कारखान्याने पीएफची रक्कम न भरल्याने ही कारवाई करण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी पगार न मिळाल्याने या कारखान्यातील ७०० कामगारांनी काही वर्षांपूर्वी आंदोलन केलं होतं. बघा यासंदर्भातील टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

