Pankaja Munde | हे दुर्दैवी.. पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापा… नेमकी भानगडही सांगितली..
जीएसटीचे लोक आले होते. काही अधिकारीदेखील होते. मी त्यांच्याशीही बोलले. अचानक हा विषय काय आहे, हेही विचारलं. त्यांना

महेंद्रकुमार मुधोळकर, बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा पडल्याने खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे बंधू-भगिनी एकाच कार्यक्रमात उपस्थित असताना तिकडे परळीत सकाळी जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची चौकशी सुरु केली. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मानूर गावी आज नारळी सप्ताहानिमित्त पंकजा मुंडे उपस्थित होत्या. मात्र तिकडे परळीत धाड पडल्याची बातमी त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली.
हे दुर्दैवी- पंकजा मुंडे
Pankaja Munde | हे दुर्दैवी.. पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापा… नेमकी भानगडही सांगतिली..https://t.co/9qskD22m76#Pankajamunde #Dhananjaymunde #Beed #GST #BJP #NCP pic.twitter.com/r2CtL8Ir9m
— manjiri Kalwit (@KalwitManjiri) April 13, 2023
पंकजा मुंडे यांना ही बातमी थेट माध्यमांकडूनच मिळाली, यावरून त्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केलं. या कारखान्याच्या जीएसटीबद्दलचा आमचा अंतर्गत वाद सुरु आहे. तो माध्यमांपर्यंत जाण्याचं काही कारण नव्हतं. मात्र आज अचानक जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. मीदेखील अधिकाऱ्यांशी बोलले. पण अर्जंट कारवाई करण्याचे वरून आदेश होते, असं मला कळालं. तसेच त्यांच्याच वरील कार्यालयाकडून ही बातमी माध्यमांपर्यंत आधी पोहोचल्याचंही मला कळलं… हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
नेमका काय आहे प्रकार?
अधिकाऱ्यांनी नेमकी का धाड टाकली, याची पार्श्वभूमी पंकजा मुंडे यांनी सांगितली. त्या म्हणाल्या, ‘ ‘ वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या 6-7 वर्षांपासून नुकसानीत आहे. कसातरी आम्ही तो चालवत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांची आम्ही काही दिवसांपूर्वी याच कारणाने भेट घेतली होती. यावेळी 4-5 काऱखान्यांचा प्रश्न मांडला होता. आम्हाला जीएसटी भरायचाय, लोन पेंडिंग आहे.असे प्रश्न होते.
कारखान्याचं जवळपास दोनशे-अडीचशे कोटी लोन आहे. आम्ही सव्वादोनशे कोटी कर्ज फेडलंय. आता पुन्हा तेवढंच आहे. या आजारी साखर कारखान्यांना मदत करा, अशी विनंती आम्ही केली होती.
आमच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीची तारीख ओलांडूनही तीन वर्षे निघून गेली. आता तो कारखाना आर्थिक अडचणीमुळे बंद आहे. तरीही अधिकारी आले, असं कळालं. आम्ही सहकार्य केलं. त्यांना जे कागदपत्र पाहिजेत, ते दिले आहेत. जीएसटीचा विषय पाहता, कोविडच्या काळात साखर वितळत होती, तेव्हा आम्ही ती विकली. त्यावेळी जे एमडी होते, त्यांना मी काढून टाकलंय. जीएसटीची सुनावणी चालली होती. ती सुनावणी झाल्यावर पैसे भरायचे आहेत, ते पैसे व्यापाऱ्याकडे ठेवलेले आहेत. त्यामुळे जीएसटीचे पैसे भरायचे तेव्हा आम्ही ते घेऊ… हा आमचा अंतर्गत वाद चालू आहे. त्यावरही मी अॅक्शन घेत आहे. पण ते पब्लिकली जाण्याचं कारण नव्हतं.
जीएसटीचे लोक आले होते. काही अधिकारीदेखील होते. मी त्यांच्याशीही बोलले. अचानक हा विषय काय आहे, हेही विचारलं.. त्यांना खूप अर्जंटली तिथं जाण्याचे आदेश आले… त्यांच्याच वरच्या कार्यालयाकडून मीडियापर्यंत ही बातमी गेली. माझ्यासारखे अनेक कारखाने असेच अडचणीत आहेत, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
