‘अशी रोखा नजर…’, विधानभवन परिसरात गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना रोखून पाहिलं, VIDEO व्हायरल
राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजच्या तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना रोखून पाहिलं असल्याचे समोर आले आहे.
राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना रोखून पाहिलं असल्याचे समोर आले आहे. विधानभवन परिसरात आदित्य ठाकरे समोरून येत असातना गुलाबराव पाटील हे त्यांच्या रोखून पाहत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. तर सभागृहात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. मंत्र्यांनी अभ्यास करुन सभागृहात उत्तरं द्यायला हवीत, असा टोला आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटलांना लगावला. ज्यावर त्यांनीही माझा अभ्यास असल्याचे म्हणत प्रत्युत्तर दिलं. “काहीही विचारलं तर मंत्री महोदय लगेच केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मंत्र्यांना खातं कळलं आहे की नाही हाच प्रश्न आहे.” असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी आज सभागृहात केलं. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आदित्य ठाकरेंवर पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. मला खातं कळतं, म्हणूनच तुमच्या वडिलांनी मला ते खातं दिलं होतं, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटल्यानंतर म्हणून तर तुम्ही पळून गेलात, असं खोचकपणे आदित्य ठाकरे म्हणाले. सभागृहात तूतू-मेंमें सुरू असताना राहुल नार्वेकर यांनी दोघांनाही सांगितलं की वैयक्तिक कमेंट करु नका. मी हे रेकॉर्डवर घेणार नाही. गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यातील हा सामना मात्र आज चर्चेचा विषय ठरला.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप

