Gunaratna Sadavarte : मनोज जरांगे मुंबईत धडक देण्यावर ठाम… गुणरत्न सदावर्तेंनी डिवचलं; म्हणाले, त्यांना आंदोलन करू देऊ नका…
मनोज जरांगे पाटील हे २९ तारखेला मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत. मात्र वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ देऊ नका, असं आवाहन करत पोलीस महासंचालकांकडे मागणी केलीये.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झालेत. येत्या २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत धडकणार आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मनोज जरांगे पाटील यांना २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करू देऊ नका’, असं विधान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलंय. यासंदर्भात सदावर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करत ही मागणी केली आहे. इतकंच नाहीतर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हा हायकोर्टावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत काही लोक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करताय, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

