AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप

वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप

| Updated on: Oct 06, 2026 | 3:11 PM
Share

दिल्लीत ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी खासदार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना मारहाण केल्याचा आरोप खासदारांनी केला. वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक संसद सदस्यांना शारीरिक इजा झाल्याचे सांगण्यात आले. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी हा संघर्ष सुरू असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना, ज्यात खासदार वर्षा गायकवाड आणि प्रतिभा धानोरकर यांचा समावेश होता, मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. आंदोलकांनी बसवर चढून निदर्शने केली आणि “वोट चोर गद्दी छोड” अशा घोषणा दिल्या. आंदोलकांचे म्हणणे आहे की, ते लोकशाही आणि संविधानासाठी लढत आहेत. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांना श्वास घेण्यासही अडचण निर्माण केल्याचा आणि महिला खासदारांनाही मारहाण केल्याचा दावा करण्यात आला.

वर्षा गायकवाड यांच्या करंगळीला रक्त लागल्याचेही सांगण्यात आले. निवडणूक आयोगावर भाजप राजकारण करत असल्याचा आणि बदनाम करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. काही मतदारसंघातून चार लाख मतदारांची नावे कमी झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार इंडिया आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

Published on: Oct 06, 2026 03:11 PM

Follow Us