AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harbhajan Singh Announces Retirement | हरभजन सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Harbhajan Singh Announces Retirement | हरभजन सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 3:56 PM
Share

भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने (Harbhajan Singh Retirement) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आज निवृत्ती जाहीर केली. 23 वर्ष व्यावसायिक क्रिकेट खेळल्यानंतर नाताळच्या पूर्वसंध्येला हरभजनने निवृत्तीची घोषणा केली.

भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने (Harbhajan Singh Retirement) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आज निवृत्ती जाहीर केली. 23 वर्ष व्यावसायिक क्रिकेट खेळल्यानंतर नाताळच्या पूर्वसंध्येला हरभजनने निवृत्तीची घोषणा केली. मूळचा जालंधरचा असलेल्या 41 वर्षीय हरभजनने 103 कसोटी, 236 वनडे आणि 28 टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले.

“सर्व चांगल्या गोष्टींना शेवट असतो. मला आयुष्यात सर्व काही देणाऱ्या क्रिकेटचा आज मी निरोप घेत आहे. माझा क्रिकेटमधला हा 23 वर्षांच प्रवास सुंदर आणि संस्मरणीय करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. मी मनापासून आभार मानतो” असे हरभजनने केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

2016 मध्ये यूएई विरुद्धच्या टी-20 सामन्यात हरभजनने शेवटचे भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर तो फक्त देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत होता. तो आयपीएलमध्ये खेळणे चालूच ठेवणार आहे. हरभजन सिंगने भारताकडून खेळताना नेहमीच दमदार कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 103 सामन्यात 417 विकेट घेतल्या. 236 वनडे सामन्यात 227 विकेट घेतल्या.