गाड्यांची काचा फोडण्याची त्याला चढली झिंग, जिथे गुन्हा केला तिथेच काढली पोलिसांनी धिंड
एमएचबी कॉलनीतील रहिवासी असलेल्या त्या तरुणाला गाडी फोडण्याची झिंग त्याला चढली होती. जवळपास दहा ते पंधरा गाड्यांची त्याने तोडफोड केली होती.
नाशिक : नाशिक ( Nashik ) शहरातील सातपुर कॉलनी ( Satpur Colony ) परिसरात वाहन फोडायच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सातपुर पोलीस घटनास्थळी भेट देत तेव्हा आरोपीला अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.
सातपूर पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत तपास केला आणि याप्रकरणी संशयित आरोपी आकाश निवृत्ती जगताप याला अटक केली. इतकंच नव्हे तर पोलिसांनी आरोपीने जिथे वाहने फोडली त्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट, कामगार भवन, जिजामाता विद्यालय, शिवनेरी चौक आदी परिसरातून धिंड काढली. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
मध्यरात्रीच्या दरम्यान मद्यपान करून फिरत असताना नशेत वाहनांची तोडफोड केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
