जागा वाटपाबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं व्यक्तव्य; म्हणाला, ‘आम्हाला बाळासाहेबांची शिकवण’
ठाकरे गटाने तगडा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भावना गवळी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. यानवरून गवळी यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी सुरू आहे.
मुंबई : यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांना घेरण्यासाठी ठाकरे गटाने प्लॅन आखत त्याचं टेन्शन वाढवलं आहे. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने तगडा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भावना गवळी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. यानवरून गवळी यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी सुरू आहे. कोण काय करतयं याकडे लक्ष न देता आम्ही मोर्चे बांधणी करत आहोत. कोण छोट कोण मोठ, कोणाला शिव्या देण्यापेक्षा कामातून मोठ झालं पाहिजे, ही आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे. जनसामान्यांसाठी काम करतो. 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या शिकवणी नुसार आम्ही काम करतोय. तर जागा वाटपासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतली असे शिंदे गटाच्या खा. भावना गवळी यांनी सांगितले आहे.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

