Special Report | महाराष्ट्रात नेमकं कुठे व कसे निर्बंध लागू शकतात? राजेश टोपे
नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. बाहेर पडताना मास्क घालावा. गर्दी टाळावी, घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. कोरोनाची लक्षणे आढल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील टोपे यांनी यावेळी केले आहे.
मुंबई : राज्यातील पुणे, मुंबई आणि ठाणे या तीन प्रमुख शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. या शहरांत होत असलेला ओमिक्रॉन आणि कोरोनाचा प्रसार पहाता तेथील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र राज्यातील इतर भागांमध्ये आजून तशी परिस्थिती नाही. पुढे बोलताना टोपे म्हणाले की, काही अनावश्यक गोष्टींमुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. ज्या गोष्टींमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे, त्यावर बंदी आणली जाईल, तसेच वेळोवेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याचे कम सुरू असून, आवश्यक असल्यास मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्बंध अधिक कडक करण्यात येऊ शकतात. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. बाहेर पडताना मास्क घालावा. गर्दी टाळावी, घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. कोरोनाची लक्षणे आढल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील टोपे यांनी यावेळी केले आहे.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
