तानाजी सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर अजितदादा परांडा मतदारसंघात ‘लाडकी बहीण’च्या कार्यक्रमाला हजेरी लावणार?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाद्वारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आज जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या परांडा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या परांडा विधानसभा मतदारसंघात हजेरी लावणार आहे. तानाजी सावंत यांच्या परांडा मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पत्रिकेत नाव पाहायला मिळत आहे. दरम्यान, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीबाबतच्या केलेल्या विधानानंतर अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. महिला सशक्तिकरण अभियानाच्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. याच कार्यक्रमातून आरोग्य मंत्री तानाजी सावंत आज ‘राईट टू हेल्थ’ अभियानाची घोषणा करण्याची शक्यताही आहे. “काँग्रेस, राष्ट्रवादीचं आणि माझं कधी जमलेलं नाही. हे वास्तव आहे. कारण ते विचार परिपूर्ण अंगात भिनलेले आहेत. त्यामुळे ते शक्य आहे. आज जरी आम्ही कॅबिनेटला मागे राहून बसलो असलो तरी बाहेर जावून आम्हाला उलट्या होतात. सहन होत नाही.”, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं.