Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ प्रकरणातील याचिकेवर 6 डिसेंबरला सुनावणी
VIDEO | दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे. कारण आदित्य ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधातील याचिकेवर ६ डिसेंबरला सुनावणी
मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३ | माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांना राशिद खान यांनी 19 हजार 750 कोटींच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटीस बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालयात राशिद खान यांनी एक याचिका दाखल केली. यानुसार 19 हजार 750 कोटींच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटीस आदित्य ठाकरे यांना बजावण्यात आली आहे. पठाण यांच्यावतीने वकील निलेश ओझा यांनी या प्रकरणी तातडीच्या सुनावणीची मागणी केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने या याचिकेची दखल घेतली आहे. न्यायालयाने याचिकेचा स्वीकार करीत 6 डिसेंबरला सुनावणी निश्चित केली आहे.
Latest Videos
Latest News