शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीसाठी विटनेस बॉक्स, विधानसभेत घडताय महत्त्वाच्या हालचाली
शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीसाठी विधानसभेत विटनेस बॉक्स लावण्यात आला आहे. या सुनावणीमध्ये सुनील प्रभू यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात आलं आणि त्यांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर आज सकाळपासून सुनावणी होतेय.
मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभेत सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांचा जबाब आज नोंदवण्याचं काम सुरू आहे. त्यांच्यासाठी खास विधानसभेत विटनेस बॉक्स लावण्यात आला आहे. पहिल्या सत्रात सुनील प्रभू यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांनी त्यांची उलट तपासणी केली. सुनील प्रभू त्यांच्या वकिलांसोबत बसले होते. यावरही शिंदे गटाने आक्षेप घेतला होता. सुनील प्रभू यांना स्वतंत्र बसण्यास देखील सांगितले होते. त्यामुळे आज होत असलेल्या सुनावणीसाठी शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीसाठी विधानसभेत विटनेस बॉक्स लावण्यात आला आहे. या सुनावणीमध्ये सुनील प्रभू यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात आलं आणि त्यांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर आज सकाळपासून सुनावणी होतेय. विधानसभेत या प्रकरणावर पहिल्या सत्राची सुनावणी झाल्यानंतर अडीच वाजेपासून दुसऱ्या सत्राची सुनावणी सुरु झाली आहे. या सुनावणीसाठी विधासभेच्या सभागृहात विटनेस बॉक्स बसविण्यात आला आहे.