Yavatmal Temperature | पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे यवतमाळकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. काल शहरातील कमाल तापमान 42.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, आजही तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे यवतमाळकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. काल शहरातील कमाल तापमान 42.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, आजही तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दुपारच्या वेळेत उकाडा इतका वाढतो की, शहरातील मुख्य रस्तेही निर्मनुष्य झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यवतमाळमध्ये 43.6 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली होती. सध्या एप्रिल महिन्यातच तापमान 42.6 अंशांवर पोहोचल्याने येत्या मे महिन्यात उष्णतेचा अधिक तीव्र फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वाढत्या उकाड्यामुळे नागरिक थंडावा मिळवण्यासाठी शीतपेयांच्या दुकानांकडे वळताना दिसत आहेत. दुपारच्या वेळी या दुकानांवर मोठी गर्दी होत असल्याचेही चित्र आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Published on: Apr 27, 2026 04:19 PM
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..

