AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?

Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी… धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?

| Updated on: Jul 01, 2026 | 10:12 AM
Share

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड,

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाटमाथा तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अशात कोणत्या ठिकाणी येलो, कोणत्या ठिकाणी ऑरेंज आणि कोणत्या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे. राज्यातील ऑरेंज अलर्टच्या यादीत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि चंद्रपूर ही ठिकाणे आहेत. येलो अलर्ट असलेल्या ठिकाणांमध्ये पालघर, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत अधूनमधून पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी काही ठिकाणी पाणी साचणे, वाहतूक मंदावणे आणि नदी-नाल्यांची पातळी वाढण्याच्या घटना समोर येत आहेत. विशेषतः घाट रस्ते आणि पूरप्रवण भागांमध्ये सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

Published on: Jul 01, 2026 10:12 AM

Follow Us