Ratnagiri Rain| रत्नागिरीत दापोलीत मुसळधार पावसाचं थैमान, दापोली बाजारपेठेत साचलं पाणी

वाशिष्ठी नदी आणि शिवनदी शेजारी असणाऱ्या नागरिकांना सतर्कत राहण्याचे आवाहन करण्यात आलेय. चिपळूण परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चिपळुणकरांनी रात्र जागून काढली. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरले, तर पाऊस असाच सुरू राहिला तर समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी भरण्याची शक्यता आहे.

दापोलीला मुसळधार पावसाने झोडपले आहे. दापोली बाजारपेठ, केळस्कर नाका, तहसील कार्यालय याठिकाणी रात्री पाणी भरलं होतं. दापोलीकरांनी रात्र जागून काढली. रात्रभर मुसळधार पावसाचं थैमान घातलं. दापोलीच्या इतिहात पहिल्यांदाच एवढं पाणी भरलंय. दुसरीकडे चिपळूणसह परिसरात गेल्या 16 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणकरांनाही रात्र जागून काढावी जागली. शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरलं आहे.

वाशिष्ठी नदी आणि शिवनदी शेजारी असणाऱ्या नागरिकांना सतर्कत राहण्याचे आवाहन करण्यात आलेय. चिपळूण परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चिपळुणकरांनी रात्र जागून काढली. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरले, तर पाऊस असाच सुरू राहिला तर समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी भरण्याची शक्यता आहे. चिपळूण नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन समिती व मदतकार्य यांचे नियोजन जाहीर केले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI