Mumbai Heavy Rain : लोकल ठप्प अन् मुंबईकरांचे प्रचंड हाल… अडीच तास पायी चालून गाठलं रेल्वे स्टेशन अन्…
गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठाणे ते सीएसटी (CST) कडे जाणाऱ्या अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे ते कल्याण च्या दिशेने जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत.
मुंबई, दादर, ठाणे, कल्याण-डोंबिवली भागात सकाळपासून मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय. या मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या लोकल सेवेवर झाल्याने प्रवाशांचे मोठ हाल झाले आहे. मुसळधार होत असलेल्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मुंबई लोकल जागीच ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशी एकाच जागी अडकून पडले. ठाणे, दादर रेल्वे स्टेशनवर पाणी साचले परिणामी प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. दादर स्टेशनवरून कर्जतला जाणारी सकाळची 10.50 ची लोकल ट्रेन संध्याकाळचे पाच वाजल्यानंतरही अजून प्लेटफॉर्मवर उभी असल्याचे पाहायला मिळत आहे यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरून प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मात्र आपलं घर गाठण्यासाठी नागरिकांनी एकमेकांच्या मदतीने रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास करत जवळील रेल्वे स्टेशन गाठत पर्यायी व्यवस्था शोधण्याचा प्रयत्न सुरू केलाय.
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी

