चार दिवसाच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात दमदार पावसाची हजेरी…
चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा मध्यरात्रीपासून भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरात जोरदार हजेरी लावली. मागील चार दिवसांपासून पाऊस न झाल्यानं वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता.
भंडारा, 31 जुलै 2023 | चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा मध्यरात्रीपासून भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरात जोरदार हजेरी लावली. मागील चार दिवसांपासून पाऊस न झाल्यानं वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. परिणामी नागरिक या उकाळ्यामुळं हैराण झाले होते. सकाळपासून प्रखर उष्णतेचे चटके बसत असताना रात्रीच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर मोहाडी तालुक्यात अनेक गावात पावसाअभावी भात पिकाची लागवड खोळंबल्यानं चिंतातुर झालेल्या शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे.
Published on: Jul 31, 2023 09:19 AM
Follow Us
Latest Videos
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
