Marathwada Flood : मंत्री दौरे करून गेले, पण अधिकारी काही येईनात? शेतकऱ्याच्या मदतीसीठी विनवण्या अन् आक्रोश
पावसाचा जोर कमी झाला असला तरी पिक अजूनही पाण्यातच आहे.त जालनाच्या जाफराबादच्या देवळे गव्हाण या गावात 12 ते 13 शेतकरी मिळून तब्बल 90 एकर ऊस जमीनदोस्त झालाय. मध्यरात्रीच्या पावसान देवळे गव्हाड, गाडे गव्हाड, बुटखेडा आणि लोणगावला हा तडाखा बसलाय.
मंत्री नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून गेलेत पण अनेक ठिकाणी अधिकारीच पोहोचत नसल्याची तक्रार शेतकरी करतात. तसंच सरकारकडून जी मदत मिळतेय ती तुटपुंजी असल्याची टीका ही होऊ लागली आहे. अधिकारी सरसकट पंचनामे करत नसल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोर जावं लागलं. बागेचं फक्त 30 टक्केच नुकसान झाल्याने पंचनामे कसे करू असा सवाल केल्यानंतर शेतकरी आक्रमक झाला आहे. तर लातूरात तिरू नदीच्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतीच वाहून गेली आहे शेतात मातीऐवजी चक्क दगड धोंडे आणि रेतीचाच खच पाहायला मिळतोय. त्यात सरकारन प्रति गुंठा 87 रुपये दिल्यान त्यात काय होणार असा सवाल शेतकरी विचारतात.
Published on: Sep 30, 2025 11:20 AM
Latest Videos
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...

