Nanded Cloudburst : नांदेडमध्ये पावसाचं थैमान, गुरं-ढोरं दगावली, गावं पाण्याखाली अनेक संसार उघड्यावर, बघा विदारक दृश्य
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ (NDRF) आणि सैन्य दलांना पाचारण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यात सध्या पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. मुखेड तालुक्यात २६० मिलीमीटरहून अधिक पाऊस झाल्याने लिंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. या पुरामुळे रावणगाव, हासनाळ, भासवाडी आणि भिंगेली ही गावं पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. या घटनेत हासनाळ गावात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे तर काही जण बेपत्ता आहेत. एनडीआरएफ आणि भारतीय सेनेने मदतकार्यासाठी घटनास्थळी दाखल झालेत. ढगफुटीमुळे पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. मुखेड तालुक्यातील मुकरमाबाद गावात ४० ते ५० मेंढ्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. शेकडो जनावरेही पाण्यात वाहून गेली आहेत. मुसळधार पावसानं अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याचे विदारक दृश्य समोर आले आहे.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?

