Mumbai Rain Update : समुद्राला उधाण आलं; उंच लाटा उसळणाऱ्या लाटा अन् मुंबईकरांची मरिन ड्राइव्हवर गर्दी
Mumbai Weather Updates : समुद्राला उधाण येणार आहे. 4.27 मीटरच्या उंच लाटा उसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.
समुद्राला उधाण येणार आहे. 4.27 मीटरच्या उंच लाटा उसळणार असल्याची माहिती दिलेली आहे. आज समुद्रात 4.27 मीटरच्या उंच लाटा उसळणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं असल्याने आज समुद्र खवळलेला बघायला मिळत आहे. समुद्राच्या लाटा उंच लाटा किनाऱ्यावर येऊन धडकायला सुरूवात झालेली आहे. त्यातच आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाला देखील सुरूवात झालेली आहे. त्यामुळे या वातावरणात समुद्राच्या लाटा बघण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी मरिन ड्राइव्ह भागात केलेली आहे. रविवारची सुट्टी असल्याने आज अनेक मुंबईकर परिवारासाहित याठिकाणी आलेले आहेत. उद्या देखील दुपारी 3.05 मीटरच्या लाटा उसळणार आहेत.
दरम्यान, मुंबईत शनिवारी सायंकाळपासून पाऊस कोसळत असून रविवारी पहाटेपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. दिवसभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दुपारी २.५२ च्या सुमारासा समुद्राला मोठी भरती आली. या कालावधीत सुमारे ४.२७ मीटर उंच लाटा उसळल्याचं दिसून आलं. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

