AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Terrorist Arrested | देशभरातून 6 दहशतवाद्यांना अटक, मुंबईत गृहमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलावली

Terrorist Arrested | देशभरातून 6 दहशतवाद्यांना अटक, मुंबईत गृहमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलावली

| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 11:45 AM
Share

दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. वळसे-पाटील यांनी तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला एटीएसचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे रेल्वेनेही उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. (dilip walse patil call police meeting after Six suspects terrorist arrest in delhi)

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या बैठकीबाबत स्वत: माहिती दिली आहे. दिल्लीत सहा अतिरेक्यांना अटक करण्यात आली. ही संवेदनशील घटना आहे. देशाच्या स्तरावरील ही घटना आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, या बैठकीतील कायदेशीर माहिती घेतल्यानंतरच त्यावर अधिक भाष्य करता येईल. आताच काही बोलणं योग्य होणार नाही, असं दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं. तसेच या बैठकीला पोलिसांच्या सर्व युनिटचे बडे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे.