आजचे जीवन हे खूप धकाधकीचे झाले आहे. विविध आजार, अपघात हे घडतच असतात. अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती आपल्यासाठी आपल्या घरच्यांसाठी एक सुरक्षीत वातावरण (Safe environment) शोधत असतो. ते त्याला विम्याच्या माध्यमातून मिळते. आज अनेकजण आयुष्यात एखादी दुर्घटना झाल्यास त्या संकटाला तोंड देता यावे यासाठी आधीच टर्म विमा (Term insurance) काढून ठेवतात. या विम्यामध्ये विविध आजार, अपघात अशा अनेक गोष्टी कव्हर होतात. मात्र हा टर्म विमा काढताना रक्कम कशी ठरवली जाते. तुमच्याकडून कोणत्या आधारावर रक्कम आकाराली जाते? हे आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.