AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : स्नो फॉल नाही, तर पावडरची गळती! एचपीसीएलच्या प्लान्टमधला प्रकार

Mumbai : स्नो फॉल नाही, तर पावडरची गळती! एचपीसीएलच्या प्लान्टमधला प्रकार

| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 5:04 PM
Share

चेंबूरच्या वाशीनाका येथील गव्हाणगावात एचपीसीएल(HPCL)च्या प्लांटमधून शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात कॅटालिस्ट पावडरची गळती झाली. त्यामुळे पूर्ण गावात पांढऱ्या रंगाची पावडर पसरली. रिक्षा, गाड्या आणि दुचाकींवरही बर्फासारखा वाटावा असा एक पांढरा थर तयार झाला होता.

चेंबूरच्या वाशीनाका येथील गव्हाणगावात एचपीसीएल(HPCL)च्या प्लांटमधून शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात कॅटालिस्ट पावडरची गळती झाली. त्यामुळे पूर्ण गावात पांढऱ्या रंगाची पावडर पसरली. विशेष म्हणजे शनिवारी दत्त जयंतीनिमित्त भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यादरम्यान ही पांढऱ्या रंगाची पावडरही भाविकांच्या जेवणात गेली. गव्हाणगावातील रिक्षा, गाड्या आणि दुचाकींवरही बर्फासारखा वाटावा असा एक पांढरा थर तयार झाला होता. पण हा बर्फाचा थर नसून पावडर असल्याचं नंतर समोर आलं.