बाबरी मस्जिद पडली तेव्हा मी तिथे होतो, एकही शिवसैनिक तिथे नव्हता- रावसाहेब दानवे

बाबरी पडली तेव्हा मी तिथे होतो. त्या ठिकाणी एकही शिवसैनिक नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लोकांना खोटं सांगू नये. दिशाभूल करू नये, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 15, 2022 | 2:29 PM

देवेंद्रजी तुम्ही बाबरी आंदोलनात गेला असताना तर बाबरी पाडायची गरज पडली नसती. तुम्ही एक पाय जरी टाकला असता तरी बाबरी खाली आली असती. लोकांना श्रमही करावे लागले नसते, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या बाबरी आंदोलनातील सहभागाची खिल्ली उडवली. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाबरी पडली तेव्हा मी तिथे होतो. त्या ठिकाणी एकही शिवसैनिक नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लोकांना खोटं सांगू नये. दिशाभूल करू नये, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें