मी जेलमध्ये गेले संजय राऊत नाही; राऊतांशी आमनेसामने झाल्यानंतर नवनीत राणांची प्रतिक्रिया

"मला वाटतं माझी लढाई हे माझे विचार आहेत. ते महाराष्ट्राच्या विकासासाठी आहेत. ते तिथे आले आहेत म्हणून मी गेले नसते तर मी माझ्या कामाशी अन्याय केल्यासारखं झालं असतं. माझा समजुतदारपणा मोठा आहे."

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 20, 2022 | 4:45 PM

खासदार नवनीत राणा दिल्लीत आल्यावर लेह दौऱ्याबाबत आणि राऊतांच्या भेटीबाबत नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी नवनीत राणा म्हणाल्या, “मला वाटतं माझी लढाई हे माझे विचार आहेत. ते महाराष्ट्राच्या विकासासाठी आहेत. ते तिथे आले आहेत म्हणून मी गेले नसते तर मी माझ्या कामाशी अन्याय केल्यासारखं झालं असतं. माझा समजुतदारपणा मोठा आहे. त्याप्रमाणे मी त्यांच्याशी वागले. त्यांच्यावर काही अन्याय नाही झाला अन्याय तर माझ्यावर झाला आहे. तरी मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. माझी विचारांची लढाई संपलेली नाही. ते महाराष्ट्राच्या हिताचे काम करत नाहीत . त्याविरोधात मी लढत राहणार आहे. तसेच मी त्यांच्याबद्दल जे काही बोलले आहे, त्यावर मी आजही कायम आहे.” त्यांनी माझ्या मुलांशी त्यांनी संवाद साधला, असेही त्यांनी सांगितले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें