WITT Global Summit : अयोध्येतील राम मंदिर झालं नसतं तर… अमित शाह यांनी Tv9 च्या कॉन्क्लेव्हमध्ये काय म्हटलं?
TV9 नेटवर्कच्या ‘What India Thinks Today’ च्या दुसऱ्या पर्वामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी त्यांनी राजकीय वर्तुळातील अनेक चर्चेत असणाऱ्या मुद्द्यांवर भाष्य केले. अशातच अयोध्येत राम मंदिर साकारण्यात आल्यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
नवी दिल्ली, २८ फेब्रुवारी २०२४ : TV9 नेटवर्कच्या वार्षिक कॉन्क्लेव्ह ‘What India Thinks Today’ च्या दुसऱ्या पर्वामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी त्यांनी राजकीय वर्तुळातील अनेक चर्चेत असणाऱ्या मुद्द्यांवर भाष्य केले. अशातच अयोध्येत राम मंदिर साकारण्यात आल्यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावर बोलताना अमित शाह म्हणाले, ‘अयोध्येत राम मंदिर झालं नसतं तर राजकारण झालं असतं. कारण मंदिराची मागणी चालूच राहिली असती आणि राजकारण झालं असतं. आता अयोध्येत राम मंदिर झालं आहे’, असे म्हणत आम्ही विकासाच्या नावावर मतं मागत आहोत, असे त्यांनी म्हटले तर आगामी लोकसभा निवडणुकीआधी कोणताही सर्वे करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले 400 पार तर निश्चितच आमचा पक्ष चारशे पार करणार असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला. कोणत्याही सर्वेची गरज नाही. मोदी म्हणाले 400 पार तर आम्ही निश्चित 400 पार करणार आहे. पहिल्यांदाच देशातील लोक गुलामीतून मुक्त होत आहे. देशात नवी संसद झाली आहे. नव्या भारताची सुरुवात झाली असून अर्थव्यवस्था पाच नंबरवर आली. ‘मोदी थ्री’मध्ये आपण जगातील तीन नंबरची अर्थव्यवस्था होणार आहोत. मोदींना पुन्हा संधी द्या, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

