The Kerala Story : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा कुणी केला मौलाना म्हणून उल्लेख?
VIDEO | मौलाना जितेंद्र आव्हाड यांनी 'केरला स्टोरी' चित्रपट बंद करून दाखवावा, कुणी दिला इशारा
मुंबई : राज्यासह देशभरात ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, खोटारडे पणाला देखील हद्द असते. एका राज्याला आणि एका धर्माला बदनाम केले जात आहे. या चित्रपटाचा निर्मात कोण आहे, त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे. चित्रपटाच्या माध्यमातून महिलांना देखील बदनाम केले जात आहे. यावरून जितेंद्र आव्हाड वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जितेंद्र आव्हाड यांना थेट आव्हान दिले आहे. यावेळी सोमय्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख मौलाना असा करत हिम्मत असेल तर केरला स्टोरी हा चित्रपट बंद करून दाखवा, असे आव्हान दिले आहेत. तर उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी देखील केरला स्टोरी बंद करून दाखवा, हिम्मत असेल तर केरला स्टोरी चित्रपटाच्या प्रोड्युसरला हात लावून दाखवा, असे म्हणत हे सरकार हिरवे रंग वस्त्र धारी सरकार नाही किंवा सत्तेच्या खुर्चीसाठी भगवे त्याग करून हिरवे वस्त्र घातले नाही, असे म्हणत सोमय्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.