Devendra Fadnavis | मदिरालय उघडू शकता मग मंदिरं का नाही? फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल

देशभरात मंदिरे सुरू आहेत. महाराष्ट्रातच बंद आहे. त्यामुळे या सरकारला सुबुद्धी मिळावी म्हणून गणरायाला साकडे घातले आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. (devendra fadnavis)

मंदिराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. देशभरात मंदिरे सुरू आहेत. महाराष्ट्रातच बंद आहे. त्यामुळे या सरकारला सुबुद्धी मिळावी म्हणून गणरायाला साकडे घातले आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मंदिरं सुरू करण्याची आमची मागणी केवळ यासाठी आहे की, आम्ही हिंदू आहोत. आमचे 33 कोटी देव आहेत. सगळीकडे, जिथे आम्ही मानू तिथे देव आहे. पण त्यासोबत या मंदिरांवर अवलंबून असलेले लाखो लोक आहेत. कुणी फुलं, कुणी प्रसाद, कुणी उदबत्ती, कुणी हळद-कुंकु विकतंय. मंदिरांवर अवलंबून असलेले पुजारी, तिथले सेवक आहेत. या दोन वर्षाच्या काळात या सगळ्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. म्हणून आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की मदिरालय सुरू होऊ शकतं तर मंदिर का नाही? सरकारनं हवं तर नियमावली लावावी आणि मंदिरं सुरू करावीत. आज देशभरातील मंदिरं सुरू आहेत. फक्त महाराष्ट्रातील मंदिरं बंद आहेत. त्यामुळे गणरायाने सरकारलाही सुबुद्धी द्यावी अशी, असं फडणवीस म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI