Maharashtra Rain : महाराष्ट्राची चिंता वाढणार! 12 ते 14 ऑगस्टदरम्यान ‘या’ भागात मुसळधार, IMD चा इशारा काय?
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, १२ ते १४ ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात बुधवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. या आठवड्यात बुधवार, १३ ऑगस्ट रोजी बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने या पार्श्वभूमीवर राज्यात १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्टदरम्यान विदर्भ, तसेच कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी मुंबई परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाजदेखील हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर १४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच विदर्भात १३ ऑगस्ट आणि १४ ऑगस्टल रोजी गडचिरोली आणि यवतमाळमला हवामान खात्याकडून ऑरेंज ॲलर्टही देण्यात आला आहे.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

