Monsoon BIG Update : मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात पण महाराष्ट्रात कधी बसरणार?
मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अंदमानही व्यापला असल्याचे सांगितले जात आहे. अशातच 27 मेपर्यंत केरळात मान्सून धडकणार असून महाराष्ट्रात कधी पडणार? याची उत्सुकता लागून आहे.
मान्सूस संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. अरबी समुद्रासोबतच मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकला असून येत्या २७ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर महाराष्ट्रात ७ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून आज अरबी समुद्र, मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात पुढे सरकला आहे. के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवसांत मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेघगर्जनेदरम्यान बाहेर पडणे टाळा. झाडांना आश्रय म्हणून घेऊ नका. सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, असे आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

