Imtiaz Jaleel : बीएमसी हाती आल्यावर शिंदे गटाला कुठे सोडून देतील कळणारही नाही, इम्तियाज जलील यांचा भाजपावर हल्लाबोल
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एमआयएमने यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत या विषयावर झालेल्या बैठकीला खा. जलील हजर होते.
नवी दिल्लीः बीएमसीवर (BMC Election) सत्ता मिळवणे हाच भाजपाचा हेतू आहे. एकदा मुंबई महापालिका भाजपाच्या (BJP) हातात आल्यावर त्यांच्यासमोर दुसरे कोणतेही मोठे आव्हान नाही. त्यानंतर शिंदे गटाला ते कुठे सोडून देतील कळणारही नाही, असा घणाघात एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. हा माझा अंदाज खरा ठरणार असून तुम्ही आजच हे रेकॉर्ड करून ठेवा, असे वक्तव्यही खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी केले आहे. भाजपावर टीका करताना खा. जलील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही चौफेर टीका केली आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एमआयएमने यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत या विषयावर झालेल्या बैठकीला खा. जलील हजर होते.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

