Special Report | निवडणुकीचा धुरळा-TV9

आज पाच निवडणूक राज्यांचे आरोग्य सचिव आणि केंद्रीय आरोग्य सचिवांसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर या बैठकीत या बाबत निर्णय घेण्यात आला. नव्या निर्णयानुसार आता 31 जानेवारीपर्यंत ऑफलाईन प्रचारावर बंदीच असणार आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 22, 2022 | 10:40 PM

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकांचा (5 State Assembly Election) प्रचार ऑनलाईनच करण्याचं आवाहन करताना निवडणूक आयोगानं (Election Commission) महत्त्वाचे निर्देश दिले होते. रोडशो, प्रचारसभा, रॅली यावर बंदी घालण्यात आली होती. अखेर ही बंदी उठणार की नाही, याबाबत आज निर्णय करण्यात येणार होता. याकडे पाचही राज्यांच्या राजकीय उमेदवारांचं लक्ष लागलं होतं. अखेर निर्णय समोर आला असून कोणत्याही राजकीय पक्षांना या निर्णयातून अल्पसा दिलासा मिळाला आहे. कारण निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना प्रचार ऑफलाईन करता येणार नव्हता. अनेकांना ऑनलाईन (Online) प्रचारावरच भर द्यावा लागला होता. दरम्यान, जे नियम निवडणूक आयोगानं घालून दिले आहेत, त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासोबत काही नियमांत अल्पसा बदल करण्यात आला आहे. आज पाच निवडणूक राज्यांचे आरोग्य सचिव आणि केंद्रीय आरोग्य सचिवांसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर या बैठकीत या बाबत निर्णय घेण्यात आला. नव्या निर्णयानुसार आता 31 जानेवारीपर्यंत ऑफलाईन प्रचारावर बंदीच असणार आहेत. मात्र अशातही काही अंशी दिलासादेखील देण्यात आला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें