Aurangabad | औरंगाबादेत 2 शेतकरी गेले वाहून, धमोरी गावातली घटना
सोमवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने औरंगाबादसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात हाहाकार माजवलाआहे. परभणी, जालना, बीड, उस्मनाबाद, लातूरमध्येही पावसाचा अधिक जोर आहे.
गुलाब चक्रिवादळाचा धोका औरंगाबाद शहरासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना बसेल, अशा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. त्याप्रमाणे सोमवारी मध्यरात्रीतून सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढत गेला. औरंगाबाद शहरातही हेच दृश्य दिसून आले. (Cloudburst in Aurangabad)यामुळे शहरातील विविध ठिकाणी घरात पाणी घुसले. तसेच वीजेचे खांब कोसळून विद्युत पुरवठाही खंडित झाला. दरम्यान मंगळवारी दिवसभरही पावसाची संततधार सुरुच होती. दरम्यान जिल्ह्यातील नागझरी नदीलाही पूर आला होता. या पुरात दोन शेतकरी वाहून गेले आहेत. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

