Sangli मध्ये नवरदेवाने शिवगर्जना म्हणत आपल्या वैवाहिक जीवनास सुरुवात केली

ओंकारने शिवगर्जना म्हणत आपल्या वैवाहिक जीवनास सुरुवात केली. लग्नसराईचा काळ असल्याने सर्वत्र आपल्याला विवाहसोहळ्याची धामधूम दिसून येतेय. घरात लगीनघाई असल्याने प्रत्येकजण त्या कामात असतो. लग्न ही आयुष्यातली एक महत्त्वाची घटना असल्याने ती संस्मरणीय व्हावी असा प्रयत्न प्रत्येकाचा असतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Feb 13, 2022 | 7:57 PM

सांगली : पलूस (Palus) येथे नवरदेवाने (Groom) आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करत असताना मंगलाष्टकाच्या अगोदर सोहळ्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवगर्जना (Shivgarjana) म्हणून सर्वांच्या अंगावर शहारे आणले. पलूस येथील संग्राम हॉलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. ओंकार निवास पाटील आणि प्रियंका रघुनाथ मोरे यांचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी ओंकारने शिवगर्जना म्हणत आपल्या वैवाहिक जीवनास सुरुवात केली. लग्नसराईचा काळ असल्याने सर्वत्र आपल्याला विवाहसोहळ्याची धामधूम दिसून येतेय. घरात लगीनघाई असल्याने प्रत्येकजण त्या कामात असतो. लग्न ही आयुष्यातली एक महत्त्वाची घटना असल्याने ती संस्मरणीय व्हावी असा प्रयत्न प्रत्येकाचा असतो.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें