Special Report | देगलूरमध्ये कॉंग्रेस…दादरा नगरमध्ये शिवसेना !

जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यावर 41 हजार 933 मतांनी विजय मिळवला आहे. तर दादरा नगर हवेली या जागेवर शिवसेनेने भगवा फडकवलाय.

देगलूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणे देगलूरमध्येही महाविकास आघाडीला झटका देत विजय मिळवू असा जावा भाजपकडून केला जात होता. मात्र, देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसलाय. देगलूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा मोठा विजय झालाय. जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यावर 41 हजार 933 मतांनी विजय मिळवला आहे. तर दादरा नगर हवेली या जागेवर शिवसेनेने भगवा फडकवलाय. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने आपली जादू दाखवून ही जागा खिशात घातली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI