Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये भाजपच्या 22 नगरसेवकांसह 32 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

टीम ओमी कलानीच्या भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या 22 नगरसेवकांनी हातावर ‘घड्याळ’ बांधले आहे. उल्हासनगर महापालिकेवर आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला. कलानी परिवाराच्या प्रवेशामुळे शहरात पक्षाला बळ मिळेल, असंही आव्हाड म्हणाले.

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. माजी आमदार पप्पू कलानी यांच्या सूनबाई आणि उल्हासनगर महापालिकेच्या माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर टीम कलानीच्या 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश झाला. पंचम कलानी या तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या चिन्हावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. आता राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी पंचम कलानी यांनी उल्हासनगरचे महापालिका आयुक्त राजा दयानिधी यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. टीम ओमी कलानीच्या भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या 22 नगरसेवकांनी हातावर ‘घड्याळ’ बांधले आहे. उल्हासनगर महापालिकेवर आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला. कलानी परिवाराच्या प्रवेशामुळे शहरात पक्षाला बळ मिळेल, असंही आव्हाड म्हणाले. कलानी गटाचे 22 आणि इतर 10 अशा 32 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI