Pune Crime Video : पुण्यातील ‘या’ घटनांमुळे एकच संताप! शहर हादरलं; कुठे अश्लील चाळे, कोयत्यानं हल्ला तर कुठे टोळक्यानं मारहाण
पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल राज्यभरातील लोकांकडून केला जात आहे. आज पुन्हा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शास्त्रीनगर चैकातील सिग्नलवर एका तरूणाने महिलांसमोरच अश्लील चाळे केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अनेक गुन्हेगारी कृत्य आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे पुणे शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा धाक राहिलाय का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. आज सकाळी पुण्यातील शास्त्रीनगर चैकातील सिग्नलवर एका तरूणाने महिलांसमोरच अश्लील चाळे केल्याचे पाहायला मिळाले. या तरूणाने महागड्या बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून हे अश्लील कृत्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर पुण्यातील सिंहगड रस्ता भागात किरकोळ वादातून मारहाण करण्यात आली. कामावरून घरी निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्यावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सिंहगड रस्ता भागात घडली. टोळक्याने कोयत्याने वार केल्याने तरुण जखमी झाला. या प्रकरणी रात्री सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासह पुण्यातील खेडमधील एका कंपनीत कामगारांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर दुसरीकडे पुण्याच्या कोथरूड परिसरात तरूणाला धारदार शस्त्राने मारहान केली आहे.

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका

आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'

चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'

प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
