AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं

INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं

| Updated on: Jun 08, 2026 | 12:05 PM
Share

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेली INDIA आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आज नवी दिल्ली येथे पार पडणार आहे. दुपारी 12 वाजता होणाऱ्या या बैठकीत आगामी राजकीय रणनीती, निवडणूक तयारी आणि विरोधी पक्षांच्या समन्वयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, बैठकीपूर्वीच राजधानीत राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, NDAच्या आगामी बैठकीपूर्वी दिल्लीतील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनर्समधून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तसेच INDIA आघाडीतील प्रमुख नेत्यांवर टीका करण्यात आली आहे.

बॅनर्सवर “INDIA आघाडीमुळे काँग्रेसमध्येच बिघाडी होत आहे” असा उल्लेख करण्यात आला असून, विरोधी पक्षांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या जुन्या विधानांचाही उल्लेख या बॅनर्समध्ये करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, INDIA आघाडीच्या बैठकीपूर्वी झालेल्या या बॅनरबाजीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, विरोधी पक्षांच्या एकजुटीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय होतात आणि त्यावर सत्ताधारी तसेच विरोधकांची पुढील भूमिका काय असते, याकडे देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 08, 2026 12:04 PM

Follow Us