इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं
दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी ठिय्या आंदोलन केले. मतदार यादीतील गोंधळ आणि मतदारांची नावे वगळल्याच्या आरोपांवरून हे आंदोलन झाले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह अनेक खासदार यात सहभागी झाले होते. पोलिसांनी त्यांना अडवले, तरीही आंदोलन सुरूच राहिले.
इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केले. आकाशवाणी भवनजवळ झालेल्या या आंदोलनात राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह विविध पक्षांचे १५० हून अधिक खासदार सहभागी झाले होते. मतदार यादीतील कथित गोंधळ आणि मतदारांची नावे वगळण्याच्या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून खासदारांचा मोर्चा अडवला असता, राहुल गांधी यांनी बॅरिकेड्सवर चढून आणि प्रियांका गांधी यांनी खाली बसून ठिय्या देण्याचे आवाहन केले. त्यानंतर अनेक खासदारांनी तिथेच ठिय्या दिला.
एसआयआर मतदार यादीतील अनियमितता रद्द करावी आणि निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी इंडिया आघाडीकडून करण्यात आली. डॉ. अमोल कोल्हे यांनी व्होट चोरी होत असल्याचा आरोप केला, तर संजय राऊत यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. महाराष्ट्रातील संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, सुप्रिया सुळे यांसारखे खासदारही या आंदोलनात सहभागी झाले होते.
Published on: Oct 06, 2026 12:56 PM
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार,
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...

