India-Pakistan Ceasefire Updates : आज युद्धविरामाची मुदत संपणार? भारतीय लष्कराने दिलं स्पष्टीकरण
Indian Army On Ceasefire : आज युद्धविरामाची मुदत संपत आहे. त्यानंतर पुन्हा दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती तयार होईल, अशा चर्चा होत आहेत. त्यावर भारतीय लष्कराने स्पष्टीकरण दिलेलं आहे.
आज युद्धविराम संपणार या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचं भारतीय लष्कराने म्हंटलं आहे. तसंच भारत – पाकिस्तानच्या डिजीएमओंची कोणतीही नियोजित चर्चा आज नाही. 12 मे रोजी दोन्ही देशांचे डिजीएमओ एकमेकांशी बोलले, तो शेवटचा संवाद होता. त्यानंतर कोणतीही चर्चा नव्हती, असंही भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे.
भारत – पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघन न करण्याच्या निर्णयानंतर आज हा युद्धविराम संपणार असून पुन्हा दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. माध्यमांमधून देखील अशा प्रकारच्या बातम्या चालवल्या गेल्या आहेत. त्यावर आता भारतीय लष्कराकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. दोन्ही देशांच्या डिजीएमओंची कोणतीही नियोजित चर्चा आज होणार नाही आहे. 12 मे रोजी झालेल्या शेवटच्या चर्चेत युद्धबंदीचा नियम आणि त्याबद्दलच्या अटी शर्थी या ठरवण्यात आलेल्या होत्या. तीच भारत – पाकिस्तानच्या डिजीएमओंची शेवटची चर्चा होती. त्यावेळी युद्धविरामाला कोणतीही मुदत ठरवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आज युद्धविराम संपणार या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, असंही यावेळी भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलेलं आहे.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

