Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, एसआयआर रद्द करणे आणि ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासह विविध मागण्यांसाठी इंडिया आघाडीने तीन दिवसीय आंदोलन पुकारले आहे. आजच्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधींच्या नेतृत्वात खासदार आणि कार्यकर्ते राजघाटावर शांततापूर्ण प्रार्थना करण्यासाठी एकत्र आले आहेत, सरकारला सद्बुद्धी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.
इंडिया आघाडीने तीन दिवसीय आंदोलनाच्या समारोपासाठी आज दिल्लीतील राजघाटकडे कूच केली. वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदार बसमधून राजघाटकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत युथ काँग्रेस आणि एनएसयुआयचे कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत, हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत आहेत.
गेले दोन दिवस हे आंदोलन आक्रमक स्वरूपाचे होते. पहिल्या दिवशी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी आकाशवाणी भवनाजवळ ठिय्या आंदोलन केले. दुसऱ्या दिवशी जंतर-मंतरवर जाण्यापासून पोलिसांकडून रोखण्यात आल्यानंतर, राहुल गांधींनी तिथेच ठिय्या दिला, तर प्रियंका गांधींना ताब्यात घेण्यात आले होते.
आजच्या तिसऱ्या दिवशी मात्र, इंडिया आघाडीने शांततेचा मार्ग निवडला आहे. महात्मा गांधींच्या समाधी स्थळी, राजघाटावर जाऊन सरकारला सद्बुद्धी मिळावी, यासाठी प्रार्थना केली जाणार आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, एसआयआर रद्द करणे आणि ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासह अनेक प्रमुख मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहेत. राजघाटाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.
Published on: Oct 08, 2026 04:55 PM
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....

