PM Shehbaz Sharif : पाकिस्तानला आणखी एक झटका, भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेल बंद
पहलगाम हल्ल्यापासून, भारत पाकिस्तानवर सतत डिजिटल स्ट्राइक करताना दिसतंय. यादरम्यान, अनेक सोशल मीडिया अकाउंट देखील ब्लॉक केले आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कठोर कारवाई केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे यूट्यूब चॅनल बंद केले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत शेजारी देशाविरुद्ध सतत कठोर कारवाई करत आहे. आता भारताने आणखी एक डिजिटल स्ट्राईक करत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे यूट्यूब अकाउंट सस्पेंड केले आहे. याआधीही भारताने पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि मीडिया संस्थांसह अनेक लोकांचे यूट्यूब आणि ट्विटर अकाउंट बंद केले होते.
भारताने पाकिस्तानमधील एकूण 16 यूट्यूब चॅनेल्स भारतात बंद करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, जेओ न्यूज यासारखी यूट्यूब समावेश असून ते बंद करण्यात आले आहेत. तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरचेही यूट्यूब चॅनेल बंद करण्यात आले आहे. यासह भारताने पाकिस्तानचे क्रिकेटपटू बाबर आझम, शाहीन आफ्रिदी तसेच मोहोम्मद रिझवान या तीन महत्त्वाच्या आणि मोठ्या खेळाडूंची इन्स्टाग्राम अकाऊंट्स भारतात बंद करण्यात आली आहेत.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

